करोनाची खोटी बातमी शेअर केल्याने ५२ व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला पकडले नाही

व्हॉट्सअॅपवर एक मेसेज मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. मुंबईच्या दादर सायबर क्राईम पोलिस स्टेशनने व्हॉट्सअॅपवर भ्रमित करणारी चुकीची फॉरवर्डेड माहिती शेअर केल्यानंतर ५२ ग्रुप अॅडमिनला पकडले आहे. प्रत्येक अॅडमिन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा मेसेज व्हायरल होत आहे.

मेसेजमध्ये हा दावा करण्यात आला आहे की, जर यापैकी कुणालाही जामीन मिळाला तर त्यांना क्रिमिनल कोर्टमध्ये लढाई लढावी लागेल. या सर्वांना १ ते ५ वर्षारपर्यंत जेल होऊ शकते. जर अॅडमिन ग्रुप ने स्पष्टीकरण दिली की, मी मेसेज पाहिला नाही. तरीही त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल.

याच मेसेजमध्ये एक दावा करण्यात आला आहे की, केंद्र सरकारने करोना व्हायरसवर कोणत्याही प्रकारची पोस्ट केल्यास दंडणीय गुन्हा असल्याचे जाहीर केले आहे. आता केवळ सरकारी एजन्सी करोना व्हायरस संदर्भात पोस्ट करू शकतील. कोणत्याही चुकीच्या मेसेज किंवा पोस्टमुळे ग्रुप अॅडमिनसह संपूर्ण व्हॉट्सअॅप ग्रुप सदस्यांविरुद्ध आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला जावू शकतो.