देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे विमा नुतनीकरणात निर्माण झालेले अडथळे लक्षात घेत सरकारने आज विमाधारकांना दिलासा दिला आहे. सरकारने आरोग्य विमा आणि थर्ड पार्टी मोटार विमा नुतनीकरणाला मुदतवाढ दिली आहे. या मुदतवाढीने ग्राहकांना विमा पाॅलिसीचे २१ एप्रिलपर्यंत नूतनीकरण करता येईल.
सरकारने २५ मार्च ते १४ एप्रिल २०२० या काळात नुतनीकरण होणाऱ्या आरोग्य आणि मोटार विमा पॉलिसीसाठी नुतनीकरणाला २१ एप्रिल २०२० पर्यंत मुदतवाढ दिली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मागील आठवडाभरापासून देशभर लॉकडाऊन सुरु आहे. यामुळेे विमाधारकांना विमा कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन पाॅलिसी नुतनीकरण करणे अशक्य बनले आहे. या काळात पाॅलिसी रद्द होऊ नये म्हणून केंद्रीय अर्थ मंत्रालयाने विमा पॉलिसी नुतनीकरणासंदर्भात अधिसूचना काढली आहे.