GST: रियलमीचे स्मार्टफोन १८ टक्क्यांपर्यंत महाग

चीनची स्मार्टफोन कंपनी रियलमी (Realme) ने आपल्या स्मार्टफोनच्या किंमतीत १८ टक्क्यांर्यंत वाढ केली आहे. जीएसटी १२ टक्क्यांवरून १८ टक्के केल्यानंतर कंपनीने या दरवाढीची घोषणा केली आहे. जीएसटीच्या वाढीनंतर शाओमी, ओप्पो, पोको आणि आयफोनच्या दरवाढीनंतर आता रियलमीनेही आपल्या स्मार्टफोनच्या किंमती वाढ केली आहे. रियलमीच्या सर्व उत्पादनाची वॉरंटी कंपनीने ३१ मे पर्यंत वाढवली आहे. रियलमीचे स्मार्टफोन, स्मार्ट बँड, इयरबड्स, इयरफोन आणि पॉवरबँक या उत्पादनाचा यात समावेश आहे. रियलमीने केवळ २० मार्च ते २० एप्रिल पर्यंतच्या उत्पादनावर वॉरंटी दिली आहे. किंमत महाग केल्यानंतर रियलमीचा १० हजारांच्या फोनसाठी आता ११ हजार ८०० रुपये द्यावे लागणार आहेत.


देशात १ एप्रिलपासून जीएसटीत वाढ करण्यात आल्यानंतर शाओमी, ओप्पो कंपनीने आपल्या स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ करीत असल्याची घोषणा केल्यानंतर आता आयफोनने सुद्धा आपल्या फोनमध्ये वाढ केली आहे. जीएसटी १२ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आल्यानंतर आयफोन ११ प्रो मॅक्स iPhone 11 Pro Max ची किंमत आता १ लाख १७ हजार १०० रुपये झाली आहे. तर आयफोन ११ प्रो ची किंमत १ लाख ६ हजार ६०० रुपये झाली आहे.